| गुहागर | प्रतिनिधी |
शृंगारतळी येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन रविवारी (दि.23) मोठ्या उत्साहात झाले. यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी 11 घरघंट्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पाटपन्हाळे हायस्कूलसमोरील कै. सदाशिव बापूशेठ वेल्हाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी हजारो भक्तांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय भक्तसेवा मंडळ तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी उपस्थित होते. रामानंद सांप्रदाय, जिल्हा सेवा समिती यांच्यावतीने गुहागर तालुक्यातील प्रमुख मान्यवरांचा गौरव करण्यात आला.






