| उरण | वार्ताहर |
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगडच्या माध्यमातून उरण येथील इंदिरा गांधी झोपडपट्टी व वेश्वी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना व आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि.26) अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विकास कडू गेली आठ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत.
या कार्यक्रमास मिलिंद खारपाटील, रमणीक म्हात्रे उपस्थित होते. यावेळी विकास कडू यांनी आपण राबवित असलेल्या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सहकार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मनोज ठाकूर, ह्रितिक पाटील, तुषार ठाकूर, राजेश ठाकूर, उद्धव कोळी, निवृत्ती ठाकूर, रोशन घरत, विवेक कडू यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमणीक म्हात्रे यांनी केले.







