कोप्रोली शाळेतील मुलांना खाऊचे वाटप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कोप्रोली येथील विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रेय बाळाराम राऊत, रा. मापगाव यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले.
दत्तात्रेय राऊत हे 2018 साली शाळा सातीर्जे येथून सेवानिवृत्त झाले. त्यावर्षीपासून त्यांनी एक संकल्प केला, की दरमहिन्याला रायगड जिल्हा परिषदेच्या एका शाळेला खाऊ वाटप करेन. आतापर्यंत त्यांनी 50 हून अधिक शाळांना खाऊवाटप केला आहे.

यावेळी त्यांनी राजिप कोप्रोली शाळेत खाऊ वाटप आयोजित केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतच दर्जेदार व मोफत, उत्तम शिक्षण दिले जाते, त्याचा तुम्ही व तुमच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास शाळेचे 136 विध्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेश ठाकूर, शिक्षक स्नेहा पाटील, ज्योती पाटील, श्रद्धा भोईर, सुविधा पाटील, विजय पाटील उपस्थित होत्या.

Exit mobile version