। उरण । वार्ताहर ।
कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अनेकांना आपला संसार चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गोरगरीब असलेल्या आदिवासी बांधवांना एक मदतीचा हात म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून बेलवाडी (भंगारपाडा) आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांना खाद्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गहू, तांदूळ, साखर,चहा पत्ती , तूरडाळ, मसूरडाळ, कांदे, बटाटे, बिस्किटे आदी खाद्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर हास्य उमटले. सर्व आदिवासी बांधवानी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले.