धोदाणी भागातील आदिवासींना धान्य वाटप

रत्ननिधी ट्रस्ट, नितीन शाह यांचा स्तुत्य उपक्रम
। नेरळ । वार्ताहर ।

माथेरानच्या डोंगरात राहणार्‍या आदिवासी लोकांचे जनजीवन माथेरानवरील पर्यटनावर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी यामुळे या डोंगरात असलेलया आदिवासी वाडीतील आदिवासी लोकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली होती. मात्र, माथेरानमधील व्यापारी नितीन शाह यांच्या पुढाकाराने मुंबईमधील रत्ननिधी ट्रस्टच्या माध्यमातून 850 कुटुंबांना धान्याचे किट देऊन मदत करण्यात आली.
या संस्थेने प्रत्येक कुटुंबाला 15 किलो अन्न धान्याचे किट असे धोदाणी व आसपासच्या 12 वाड्यातील राहिवाश्यांना 830 किटचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत नितीन शाह यांनी शालेय विद्यार्थ्यांची फी भरण्यापासून त्यांच्याकडील घोड्यांना भुसा वाटप, अन्नधान्याचे किट वाटप यासाठी त्यांनी मुंबईच्या विविध सामाजिक संस्थांची मदत घेत वाटप केले आहे. यावेळी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष निमेश शाह, प्रीतिबेन शाह, ऋषिकेश जोशी, दीपक शाह, शैलेंद्र दळवी, दत्ता सनगरे, नितीन शाह व गावातील सरपंच हर्षदा चौधरी उपस्थित होत्या.

Exit mobile version