सावित्रीच्या लेकींनो खूप शिका;चित्रलेखा पाटील यांचे आवाहन

काकळघर शाळेत मोफत सायकलींचे वाटप
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
विद्यार्थिनींनो, खूप शिका, मोठे व्हा, पण शाळा व गावाला विसरू नका.अशीच एक सायकलरूपी मदत पुढे कोणाला तरी निश्‍चित करा, असा संदेश शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.निमित्त होते मोफत सायकल वाटप सोहळ्याचे. काकळघर पीएनपी शाळेत सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या स्तुत्य उपक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा चिटणीस मंडळ सहचिटणीस मनोज भगत, अलिबाग व मुरूड विधानसभा मतदार अध्यक्ष संदीप घरत, तालुका चिटणीस अजित कासार, सहचिटणीस सी.एम. ठाकूर, माजी सभापती रमेश नागावकर, पुरोगामी युवक अध्यक्ष शरद चवरकर, उसरोली सरपंच मनिष नांदगावकर, काकळघर माजी सरपंच संतोष कांबळी, बोर्ली सरपंच मतिन सौदागर, शशिकांत पारवे, सुभाष पारवे, तुकाराम पाटील, सोनाली ठाकूर, सीताराम ठाकूर, मधुकर पाटील, विनायक चोगले, स्वस्तिक ठाकूर, सुरेश नांदगावकर आदी मुरूड तालुका शेकाप कार्यकर्ते तसेच मुख्याध्यापिका वैभवी मेहतर यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होते.

माजी सरपंच संतोष कांबळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुरेश नांदगावकर यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत पारवे, तुकाराम पाटील, सोनाली ठाकूर, अजीत कासार, मनोज भगत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष ठाकूर यांनी केले.

त्यानंतर प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील व शेकापक्षाचे उपस्थित मान्यवर मंडळी यांचे हस्ते काकळघर पीएनपी शाळेच्या विद्यार्थिनींसह परिसरातील गरजू विद्यार्थिनीनाही मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version