श्रीवर्धन | वार्ताहर |
स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन येथील दांडगुरी गावात शेतकरी बांधवांना मोफत डिजिटल सातबारे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच गजानन पाटील, तलाठी देवकांत तात्या, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेलार, श्रीपाल कवाडे, पोलीस पाटील गायत्री शेलार, दिलीप खेडेकर, शेतकरी आत्माराम सावंत, शंकर करंबे, धोंडू पवार, सुधाकर शेलार, वसंत कदम, अशोक सावंत व मान्यवर सदस्य उपस्थित होते. यावेळी महसूल विभागाच्या संबंधित ऑनलाईन सुविधांची माहिती, ई-पीक पाणी यांची माहिती देण्यात आली.