पनवेलमध्ये मोफत वह्यांचे वाटप

| पनवेल | वार्ताहर |

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पनवेल तालुक्याच्यावतीने पनवेलमध्ये समाजातील विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ व मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

पनवेल शहरातील टपाल नाका येथील शनी मंदिरात झालेल्या या समारंभासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडीक, अध्यक्ष संज्योत चाळेकर, सुनील खळदे तसेच समाज बांधव व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश महाडीक म्हणाले की, समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांचे कौतुक करून समाजातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा आपल्या गुणवत्तेसाठी उपयोग करावा, असे सांगितले.

Exit mobile version