पीएनपी केळटे शाळेत मोफत वह्या वाटप

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील समाजसेवक प्रदीप कदम यांच्या विद्यमाने पीएनपी माध्यमिक शाळा केलटे येथील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, गणवेष आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्थानिक शिक्षण सल्लागार समिती अध्यक्ष किसन पवार, केलटे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष शांताराम कोबनाक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दर्गे, प्रदिप कुलकर्णी, अजित कमळाकर, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका दर्गे यांनी शाळेचा शैक्षणिक आढावा सांगताना शाळेचा निकाल 100% लागल्याचे मान्यवरांच्या लक्षात आणून दिले. समाजसेवक प्रदीप कदम यांनी सांगितले की शाळा विनाअनुदान तत्वावर असताना आणि ग्रामिण व डोंगराळ भागात शाळा असूनदेखील शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. शाळेचा शैक्षणिक गर्जा वाढविण्यासाठी शाळेत अनेक विधायक उपक्रम राबवतात. या ग्रामिण भागातील शाळेचे 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून हि बाब अत्यंत उल्लेखनीय असल्याचे प्रदिप कदम यांनी सांगून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणार्‍या अडचणी सोडविण्याचे आवाहन करून हि माझी सामाजिक बांधिलकी असल्याचे मी मानतो असेही त्यांनी सांगितले. शेवटी पाटिल सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version