। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील गृप ग्रामपंचायत किहीम येथील नागरिकांना 6 हजार वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. अलिबाग येथील सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारी आगा खान सामाजिक संस्थेच्यावतीने तसेच गृप ग्रामपंचायत किहीम यांच्या माध्यमातून येथील 6 हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक घराला चिकू, लिंब, जांभूळ अशी प्रत्येक प्रकारची तीन रोपे असे 9 वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, यावेळी आगा खान सामाजिक संस्थेच्यावतीने नागरिकांमध्ये भित्तिचित्रे काढून वृक्षारोपण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, सदस्य दिनेश सोष्टे, संतोष किर, निधी काठे, जान्हवी वाघे, कल्पिता आमले, स्नेहा आर्ते, नूतन थळे, जागृती झेरंडे, आगा खान सामाजिक संस्थेचे अलिबाग शाखेच्या अध्यक्षा अमृता पराडकर, विशाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.