। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
सद्या उत्तम पाऊस बरसत असल्याने वृक्षाची लागवड होण्यास अनुकूल वातावरण आहे. झाडांना पुरेसा पाणी पुरवठा मिळत असल्याने झाडे जोमाने वाढत असतात. यासाठी पावसाळ्यात वनखाते मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करीत असते. आगा खान संस्थेच्या अमृता पराडकर यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली असून सर्व रोपे ग्रामस्थांना मोफत देण्यात आली.
परिमंडळ वन अधिकारी कार्यालय तीनवीरा व आगाखान एजन्सी फॉर हॅबिट्याट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पेझारी येथील परिमंडळ कार्यालयात नुकतेच नागरिकांना मोफत फळझाडे रोपे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण 1200 रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी तीनविराचे परिमंडळ वन अधिकारी डॉ. निलेश चांदोरक, संदेश बैकर, किशोर म्हात्रे, धर्मा मेंगाळ, अविनाश हंबीर, अशोक मेंगाळ तसेच वाघजाई, कोळघर, तळशेत, वाघोडे, पोयनाड, दळवी खरोशी परिसरातील नागरिक उपस्थित होते.