| माणगाव | वार्ताहर |
चॅरिझेन फाऊंडेशन हि संस्था पुणे व रायगड जल्ह्यातील माणगाव येथे कार्यरत आहे. या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. संस्था समाजात सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेवून गोरगरीब जनतेसाठी, वंचितांसाठी काम करणारी संस्था म्हणून अल्पावधीत माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध झाली. या सेवाभावी संस्थेतर्फे निजामपूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील रुग्णांना नुकतेच फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, दिलीप डिगे, डॉ. रंधावा, समीर जंगम, अनिल मोकाशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिम भारसाखळे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र मंडपे, फार्मासिस्ट संदीप घायाळ ,आरोग्य सहाय्यिका शशिकला पाटील, आरोग्य सहाय्यक महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.