। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे विभागातील मालवाहतूक व्यवसाय करणारे मालक, चालक व वाहक या सर्वांची मातृसंस्था असलेल्या नागोठण्यातील प्रियदर्शनी चालक-मालक-वाहक सहकारी वाहतूक संस्था या जिल्ह्यात नावाजलेल्या संस्थेची 28 वी सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाली. अध्यक्ष सिराज पानसरे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
या वार्षिक सभेच्या सुरुवातीलाच विद्यमान संचालक नगमा अमिन सय्यद व सभासद करीम शेख अली मुजावर यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील सर्व ज्ञात, अज्ञात मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक ताळेबंद व नफा-तोटा पत्रक याचे वाचन करण्यात आले. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली. नागोठण्यात काही दिवसांपूर्वीच पूर आल्याने त्यामध्ये सभासदांच्या घरात पाणी जाऊन झालेले नुकसान, पावसाळ्यात नादुरुस्त झालेल्या गाड्यांची सभासदांना दुरुस्ती करता यावी तसेच गाडीवर टाकण्यासाठी ताडपत्री घेण्यासाठी याच सभेत 151 सभासदांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रदिप दुर्वे हे 27 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त होत असल्याने त्यांचा यथोचित सत्कारही यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थापक मारुती देवरे, सल्लागार नरेंद्रशेठ, भाई टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, हरेश काळे, लियाकत कडवेकर, शब्बीर पानसरे, कृष्णा धामणे, खंडू ठाकूर, गुलाम पाटणकर, अध्यक्ष सिराज पानसरे, उपाध्यक्ष प्रथमेश काळे, संचालक बाळासाहेब टके, विठोबाशेठ दंत, झिमा कोकरे, शैलेश रावकर, काशिनाथ जाधव, सुहेल नाडकर, सुरेखा येरुणकर, मधुकर ठमके, प्रभाकर ठाकूर, दिलीप शहासने, शंकर ठाकूर, बाळाशेठ मढवी, जिना पोत्रिक, शेखर ठाकूर, रफिक सुमरा, जितेंद्र जाधव, नरेश बामणे व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.







