महेश भगत फाऊंडेशनतर्फे किराणा वाटप

| नेरळ । वार्ताहर ।
महेश भगत फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांची दीपावली गोड व्हावी या उद्देशाने फराळालासाठी लागणार्‍या किराणा सामनाचे वाटप करण्यात येत असते. यावर्षी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगावतर्फे वराडी हद्दीतीलआंबिवली वाडीमधील आदिवासी कुटुंबाना फराळासाठी रवा, साखर, मैदा, डालडा, पोहे, बेसन अशा किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष महेश भगत, नरेश शेळके, प्रदिप मसने, ज्ञानेश्‍वर भगत,भरत मुकने, अशोक भगत हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नेरळ चे व्यापारी अम्रेश शहा तसेच विशाल साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version