पशुपालकांना आरोग्यदायी वस्तूंचे वाटप

| वावोशी | वार्ताहर |

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागात कार्यरत असणार्‍या कापणी पश्‍चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेमार्फत पशुपालकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण आणि आरोग्यदायी वस्तूंचे वितरण कार्यक्रम दि. 19 एप्रिल रोजी पंचायत समिती, खालापूर, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये आरोग्यदायी वस्तूंचे वितरण अनुसूचित जातीतील प्रशिक्षणार्थींना करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. रवींद्र झेंडे, प्राध्यापक व योजना प्रमुख, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई हे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते, तर बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, खालापूर आणि डॉ. रोहिणी गायकवाड, पशुधन विकास अधिकारी, गट अ (विस्तार), पंचायत समिती, खालापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बालाजी पुरी यांनी पशुपालकांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत सुरू असणार्‍या विविध योजनांचा लाभ त्यांच्या व्यवसायामध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच खालापूर पंचायत समितीच्या प्रक्षेत्रातील पशुपालकांसाठी कार्यक्रम घेतल्याबददल महाविद्यालयाच्या अधिकार्‍यांचे आभार मानले. डॉ. रवींद्र झेंडे यांनी कापणी पश्‍चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या योजनेबद्दल माहिती दिली आणि डॉ. (सौ.) रोहिणी गायकवाड यांनी पशुपालकांना आला उन्हाळा पशुधन सांभाळा या विषयी माहिती दिली. तर डॉ. विलास वैद्य, सहाय्यक प्राध्यापक यांनी प्राणीजन्य आजारांबद्दल घ्यावयाची काळजी याविषयी पशुपालकांना योग्य मार्गदर्शन केले.

Exit mobile version