असंघटित कामगारांना गृहोपयोगी भांडीवाटप

रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये लाभ


| पोलादपूर | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा, तळा, म्हसळा, मुरुड येथील असंघटित नाका कामगारांना महाडच्या पंचायत समितीमध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत गृहोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाड व सहाय्यक संच वाटप अधिकारी मंदार परब यांच्या आदेशाने कार्य पार पाडण्यात आले आहे.

कोकण विभाग प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तळोशी येथील रायगड जिल्हा अध्यक्ष विकास सुतार, रोहा येथील सचिव अशोक निकम, कोळसे येथील सहसचिव संतोष सुतार, गोंडाळे येथील उपाध्यक्ष अंकित सुतार, चोचिंदे येथील सहाय्यक उपाध्यक्ष शैलेश पिंपळकर, पोलादपूर येथील दीपक सुतार, काचले येथील योगेश सुतार, व वडवली येथील विश्वास सुतारयांच्या मागणीनुसार तळागाळातील असंघटित कामगारांसाठी गृहोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करण्यात आला आहे.

पंचायत समिती महाड येथील सभागृहामध्ये पंचायत समिती महाडच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील, विस्तार अधिकारी दशरथ वाघमोडे, विस्तार अधिकारी ॠतुजा लेंडी व कृषी विस्तार अधिकारी किशोर चांदोरकरयांच्या सहकार्याने व यांच्या हस्ते गृहोपयोगी भांडयांचा संच वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांचे ग्रामीण भागातील असंघटित कामगारांना सहकार्य असावे, अशी अपेक्षा यावेळी असंघटित कामगारांच्यावतीने व्यक्त करण्यात येऊन धन्यवाद देण्यात आले. गृहोपयोगी भांडी संच विभागातून पर्यवेक्षक स्वप्निल म्हात्रे व अंकित मोरे तसेच रायगड वैद्यकीय विभागातून सहायक सलोनी जमदाडे आणि माणगावचे नितीन खंदारे यांनीही यावेळी सहकार्य केले.

गृहोपयोगी भांड्यांच्या संचामध्ये 4 ताटे, 8 वाट्या, 4 ग्लास, 3 झाकणसहित पातेली, 2 मोठे चमचे, 1 पाण्याचा जग, 1 मसाल्याचा सात खणांचा डब्बा, 3 झाकणासहित मोठे डबे, परात, 1 पाच लीटर कुकर, 1 झाकणासहित कढई, 1 मोठी टाकी अशाप्रकारे 30 वस्तूंचा समाविष्ट आहे.

Exit mobile version