। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर पंचायत समिती सेस फंडातून आदिवासींना सेस फंडातून साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी माजी सभापती कांचन पारंगे,सरपंच ताई पवार,उपसरपंच श्वेता कांबळे,माजी.सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांच्या हस्ते शिवनगर आदिवासीवाडी येथील नवतरूनांना बँजो साहित्य,मोहोपाडा शिंदीवाडी येथील नागरिकांना टेबल,खुर्च्या,सतरंजी साहित्य वाटप, लोधिवली कुरंगळेवाडी सतरंजी साहित्य वाटप,रिस बौध्दवाडा जेवणाची भांडी,सतरंजी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी जांभळे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्रमोद राईलकर, निखिल डवळे, सागर सुखदरे, प्रशांत खाने,संजय कांबळे, श्याम म्हस्कर,संतोष चौधरी , प्रकाश पाटील,रमेश कांबळे, , पुंडलिक पवार, ज्ञानेश्वर पाटील,रवि देसाई,अशोक पांरगे ,जयंता पारंगे ,उमेश भोईर,अजय म्हस्कर, संतोष पारंगे,दशरथ जांभळे,रतन गायकवाड,अशोक वाघमारे,बाबू वाघमारे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष चौधरी यांनी र आभार सागर सुखदरे यांनी मानले.