देगाव शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप

| माणगाव | वार्ताहर |

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा देगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 5) स्वदेश फाउंडेशनच्या प्रयत्नांतून मिंटेल ग्रुप मुंबई यांच्यामार्फत विविध साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, टिफिन डब्बा, पाण्याची बॉटल, खेळाचे साहित्य, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणून मेघना फडके, शीतल सूर्यवंशी, भीमराव भालेराव, सिद्धेश शिर्के, सुबोध काणेकर, तुषार तेटगुरे, दीप्ती खैरे, निनाद दर्गे उपस्थित होते. तसेच गाव अध्यक्ष सुरज महाडिक, उपाध्यक्ष किशोर कदम, गाव सल्लागार सुरेश गायकवाड, सचिव राजेश गायकवाड, खजिनदार विकास कदम, अध्यक्षा, साधना गायकवाड, राजिप शाळा देगाव मुख्याध्यपिका उर्मिला मोरे, पदवीधर शिक्षक शंकर शिंदे, सहशिक्षिका प्रतीक्षा आंबुर्ले सह शिक्षिका महानंदा हारगुंडे, स्वयंपाकी समीक्षा दिवेकर, गावविकास समिती देगाव, ग्रामस्थ मंडळ देगाव, महिला मंडळ देगाव आदी उपस्थित होते. देगाव शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप केल्याबद्दल शाळेचे पदवीधर शिक्षक शंकर शिंदे गुरुजी यांनी स्वदेश फाउंडेशन व मिंटेल ग्रुप मुंबई यांचे शाळेतर्फे व देगाव ग्रामस्थांतर्फे विशेष ऋण व आभार व्यक्त केले.

Exit mobile version