| नवीन पनवेल | वार्ताहर |
ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेची मासिक सभा सरपंच सुभाष भोपी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत दूंदरे कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांचे विविध विविध प्रश्नांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. ग्रामपंचायत सभेनंतर दुंदरे हद्दीतील रिटघर, दूंदरे, दूंदरेपाडा, चिंचवली, शिवनसई, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना, शाळेला आवश्यक असणारे साहित्य खुर्च्या, टेबल कपाट देण्यात आले.
सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक कमिटीच्या उपस्थितीत दूंदरे 3 टेबल, 5 खुर्च्या, 1 कपाट, 1 ग्रंथालय तर रिटघर शाळेला 30 खुर्च्या, 1 कपाट, 1 ग्रंथालय कपाट, दूंदरे पाडा, चिंचवली, शिवणसई या प्रत्येक शाळेला 2 टेबल 5 खुर्च्या 1 ग्रंथालय कपाट, शाळांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत मांडत ग्रामपंचायत दुंदरेचे सरपंच सुभाष भोपी व कमिटीचे आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच सुभाष पुंडलिक भोपी, उपसरपंच शितल कैलास भोपी तसेच सदस्य महेश महादू पाटील, कमला लहू वाघमारे, शांताराम शंकर चौधरी, प्रलय तुकाराम भोपी, करमेलकर सुप्रिया हनुमान, ललिता संतोष चौधरी, राणी विलास सिनारे, जयदास मारुती चौधरी, विश्वास पुंडलिक पाटील, शकुंतला भीमा गोसावी आदी सदस्य, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब सरडे, भूषण भोपी आणि ग्रामस्थ मंडळी, शिक्षक वृंद उपस्थित होते.







