। पनवेल । वार्ताहर ।
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पनवेलमधील दुर्गप्रेमी शिवाजी दांगट आणि दत्तात्रय पोखरकर यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्णक्षण आहे. या दिनानिमित्त या दुर्गप्रेमींनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी मुकेश उपाध्ये, शिवाजी दांगट, संदीप शेळके, प्रथमेश पुडे, दत्तात्रय पोखरकर, सुनील जाधव, गोरक्ष बनकर, दीपक भोसले, सागर ढोले, अविनाश पाटील, सुनील पोखरकर, भरत पाटील, राजू किणे, विलास किणे आदींसह दुर्गप्रेमी उपस्थित होते.