आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप

| रसायनी | वार्ताहर |

शिवसेना उध्दव ठाकरे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील आदिवासी वाड्यांमधील शाळांमध्ये शालेय वह्या वाटप करण्यात आले आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे आपटे पंचायत समितीचे संपर्क प्रमुख तुकाराम गायकवाड यांच्या पुढाकाराने शालेय साहित्य वाटपाचा हा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, आपल्या परिसरातील आदिवासी, गरीब नागरिकांची मुले उच्च शिक्षण घेऊन पदवीधर व्हावीत हा त्यांचा मानस आहे. यासाठी तुकाराम गायकवाड हे नेहमीच सातत्याने प्रयत्न करत असतात. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला त्यांचे सहकारी जांभीवलीचे माजी उपसरपंच अशोक कोंडिलकर व सवणे येथील शिवसैनिक अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी तुकाराम गायकवाड, अशोक कोंडीलकर, अनिल देशमुख आदींनी सवणेवाडी, तुळशीमाळ वाडी, गायचरणवाडी, खुटलवाडी, कालिवलीवाडी, बागेचीवाडी, जांभीवलीवाडी, कराडेखुर्द आदी ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप केल्या.

Exit mobile version