। पेण । वार्ताहर ।
कातकरी उत्थान अभियानांतर्गत पेण तहसील कार्यालयामार्फत कुपोषित व कमी वजनाची 140 बालकांना अन्नदा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पोषण पोटलीचे वाटप करण्यात आले.
पेण तहसिल कार्यालयाच्या सरदार वाघोजी तुपे सभागृहात लाभार्थ्याना पोषण पोटलीचे वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नालि डोइफोडे, नायब तहसिलदार सुनिल जाधव, एकात्मिक बालविकास अधिकारी चेतन गायकवाड, साकव संस्थेचे अध्यक्ष अरूण शिवकर, एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या पर्यवेक्षिका रश्मी झेमसे, हर्षदा दोरे, संगीता पाटील, शोभा चव्हाण, तसेच अन्नदा संस्थेचे पप्पू गुप्ता उपस्थित होते.
पोषण पोटलीमध्ये सुष्म मिश्रीत मकई, सेाया व गहू यांचे लाडू, डाळ, सोया व मल्टिग्रेन खिचडी व चिवडा, चिक्की, भाजलेले चणे, राजगिरा, खजूर रोल, चित्रकला पुस्तके, कलर फेस मास्क या सर्व वस्तूचा समावेश करण्यात आला आहे. पोषण पोटली पेण भागातील 140 कमी वजनाच्या बालकांना उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नालि डोइफोडे, साकव संस्थेचे अरूण शिवकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.







