प्रजासत्ताक दिनानिमित्त पौष्टिक खाऊचे वाटप

| खांब | प्रतिनिधी |

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील जनसेवक संदेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील विविध शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये ‘आरोग्यदायी खाऊ, आनंदी बालपण’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उद्देशाने सुमारे 450 हून अधिक विद्यार्थ्यांना मल्टिग्रेन शेव (पौष्टिक कुरकुरे) वाटप करण्यात आले.

सध्या बाजारात मिळणारे वेफर्स आणि कुरकुरे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. तर आजच्या काळात मुले जंक फूडच्या आहारी जात आहेत. त्यांना सकस आहाराची गोडी लागावी म्हणून संदेश गायकवाड यांनी गहू, मका, रवा सोयाबीन आणि कडधान्यांपासून बनवलेली प्रोटीनयुक्त मल्टिग्रेन शेव खाऊ म्हणून निवडली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि आदिवासी वाडीतील सर्व बालकांना या खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि पालकांकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.

Exit mobile version