देश-विदेशातील 119 मान्यवरांचा सन्मान
16 जणांना मरणोत्तर ’पद्म पुरस्कार’
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. यंदा सात मान्यवरांचा ’पद्म विभूषण’, 10 मान्यवरांचा ’पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ’पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ’पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं. देशातील दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ’पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचं पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे.
पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्त) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ’पद्वभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
’पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मान
याशिवाय एकूण 10 जणांना ’पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (मरणोत्तर), भारतीय इस्लामिक विद्वान कल्बे सादिक (मरणोत्तर), पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा, समाजसेवक तरलोचन सिंग, शास्त्रीय गायक के एस चित्रा, चंद्रशेखर कंबारा, रजनीकांत देविदास श्रॉफ यांचा समावेश आहे.
’पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मान
तसंच माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (मरणोत्तर) आणि माजी केंद्रीय मंत्री बिजॉय चक्रवर्ती यांना ’पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तसंच ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक, फादर वलिस (मरणोत्तर), प्राध्यापक चमन लाल सप्रू (मरणोत्तर) यांच्यासह एकूण 102 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल.
कलाकारांचाही गौरव
त्याचबरोबर कंगना राणौत, सरिता जोशी, गायक अदनान सामी यासंहीत अनेक कलाकारांना ’पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
विशेष बाब म्हणजे ’पद्म’ पुरस्कार विजेत्यांमध्ये 29 महिलांचा तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. तसंच 10 व्यक्ती अनिवासी भारतीय (एनआरआय), भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि भारताचे परदेशी नागरिक आहेत.