महिलांना परसबाग किटचे वाटप

। पाताळगंगा । वार्ताहर ।
कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस राबविण्यात आले. यावेळी ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग भाजी, कंदमुळे लागवड करीत असतात.मात्र काहिना जागेचा आभावामुळे लागवड करु शकत नाही. यामुळे नाईलाजाने बाजारपेठ उपलब्ध होत असलेली भाजी खरेदी करावी लागते. मात्र आपल्या जेवणात ताजी भाजी उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातून तांबाटी या गावातील महिला वर्गांसाठी माझी परसबाग ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी वेबिनारद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी महिलांना शेती पूरक उद्योग, भात नाचणी वरी यांचे उपपदार्थ, विक्री व्यवस्थापन यांविषयी मार्गदर्शन केले. आपल्या घरासमोर किंवा घराच्या बाजूला भाजी लागवड करु शकतो. यामुळे आपल्या आहारात ताजी भाजी मिळणे शक्य होत असते. यासाठी थोडीशी मेहनत घेतल्यास आपणांस मोठ्याप्रमाणावर भाजी मिळत असते. यावेळी बियाणे लागवड पासून ते फळ येण्यापर्यंत काळजी कशी घ्यावी यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मिरची, काकडी, वांग, दुधी, कारले अदिचे मिनी किट बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी महिला वर्गांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version