उद्या रायगड भुषण पुरस्काराचे वितरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील, सामाजिक तसेच विविध क्षेत्रात विशेष नाविण्यपूर्ण व उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तींना रायगड जिल्हा परिषदेमार्फत प्रदान केला जातो. जिल्ह्यातील मानाचा समजला जाणार्‍या रायगड भुषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि. 6) दुपारी 2 वाजता करण्यात आले आहे. अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली खा. सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खा. श्रीरंग बारणे, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रविंद्र पाटील, आ. महेंद्र थोरवे आदी उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हण्ाून माजी आमदार सुरेश लाड, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांची उपस्थिती असणार आहे.

त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. निलीमा पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, शेकाप पक्ष प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतोद बबन चाचले, भाजप पक्ष प्रतोद अमित जाधव, काँग्रेस पक्ष प्रतोद बाजीराव परदेशी त्याचप्रमाणे अलिबाग पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Exit mobile version