अलिबाग नगरपरिषद व इकोसत्वचा उपक्रम
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग नगरपरिषद व इकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग अभियानंतर्गत बुधवारी मा.मुख्यधिकारी अंगाई साळुंखे यांच्या हस्ते सर्व कर्मचारी यांना हॅन्डग्लोज, मास्क, हायलाईटर (रिफ्लेकटर) जॅकेट देण्यात आले. यावेळी सर्व न.प. व व्हिडीके कर्मचारी, व्हिडीके मॅनेजर व सुपरवाझर व इकोसत्व यांच्या सोबत कामाचा आढाव बैठक घेतली. बैठकीत उपस्थित न.प.इंजिनिअर दिक्षा सिरसट, व्हिडीके संचालक कुणाल शिंदे, न.प.मुकादम प्रकाश तांबे, व्हिडीके मॅनेजर सुयश भुजबळ, सुपरवाझर प्रथमेश गोरे, विकास ढगे, इकोसत्व सहसमन्वयक ओंकार भालेराव, टीम लिड संतोष राखेमल्लू, नदीम खान, इकोसत्व प्रतिनिधी नैना ढोरे व कर्मचारी उपस्थित होते
प्रथम व्हिडीके मॅनेजर, सुपरवाझर, व कर्मचारी यांना कामामध्ये येणारे अडचण ऐकून घेण्यात आले व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नंतर मुख्यधिकारी यांनी कर्मचारी आदेश केले की, कामावर वेळेवर येणे, प्रामाणिकपणे काम करणे, नियोजनबद्ध काम करणे, वर्गीकृत कचरा संकलन करणे, कचरा गोणीमध्ये भरून ठेवणे, सुट्टीचा प्रमाण कमी करणे किंवा सुट्टी घेणे बाबत अगोदर कळवणे, कामामध्ये हलगर्जीपणा न करणे, यासर्व मुद्यांवर चर्चा केली व कर्मचारी यांची कौन्सलिंग करण्यात आली. तसेच मुख्यधिकारी यांनी अलिबाग मध्ये इकोसत्व करत असलेल्या कामाची कौतुक केले.






