। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किहीम येथील स्टॉल धारकांना सक्षम एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सुरक्षिततात किटचे वाटप करण्यात आले. एकीकडे पर्यटकांची वर्दळ वाढत आहे तर दुसरी कडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून सक्षमचे सदस्य मनीष मोरे यांच्या संकल्पेनेतून किहीम बीचवरील पर्यटकांची जास्त रेलचेल असलेल्या स्टॉल धारकांना मास्क, सॅनीटायसर, फेस शील्ड, अप्प्रोन आणि हँड ग्लोव्हस इत्यादी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्याची भेट देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये किहिमचे माजी उपसरपंच प्रशांत दळवी, मनीष मोरे, शुभांगी कुलकर्णी, सागर तरंगे, अभिषेक पेडणेकर, चेतन किर, अक्षय म्हात्रे, ज्यूतीका म्हात्रे, सचिन सुर्वे, योगेश पेढवी, अनिकेत नाईक आणि शार्दूल काठे यांनी सहभाग घेतला.