| रेवदंडा | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत इको-फ्रेंडली व बॉडी-फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना आरोग्य व स्वच्छतेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमाला उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक ममता म्हात्रे तसेच नेहा गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. हा उपक्रम उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव, संस्थेचे सचिव व माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तसेच संस्थेचे खजिनदार डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे जागतिक महिला दिन समाजोपयोगी व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.







