आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप

। उरण । वार्ताहर ।

केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या. चिरनेर यांच्यावतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन यावर्षी करण्यात करण्यात आले आहे. शारदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अतिदुर्गम भागातील केळाचा माल या आदिवासी वाडीवरील महिलांना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांच्यावतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामदैवत – आदिशक्तीचा जागर सोहळा तथा शारदा नवरात्रौत्सव शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यावर्षी शारदा नवरात्रौत्सव हा गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी आल्याने सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव मंडळाने आप आपल्या शहरात, गाव परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनीची मोठ्या भक्तिभावाने पुजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली आहे. यामुहूर्ताचे औचित्य साधून चिरनेर केळाचा माल या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांनी हाती घेतले.

यावेळी केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्थचे पदाधिकारी दत्ता कातकरी, अशोक कातकरी, सुरेश कातकरी, रोहित कातकरी, श्रीकांत कातकरी, राम कातकरी, राम कातकरी यांच्या उपस्थितीत कविता अशोक कातकरी , वैशाली कातकरी, किर्ती रोहित कातकरी, बेबी कातकरी, अमिषा कातकरी, देवकी कातकरी, लता कातकरी, गुलाब कातकरी, रुपाली अजय कातकरी सह इतर आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version