विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड ज्युनियर कॉलेज व सीनियर कॉलेज यामध्ये शिकत असलेल्या एकूण 7 विद्यार्थ्यांना सुधा सितारा सुदर्शन कंपनीतर्फे शिष्यवृती प्रदान करण्यात आली.

यामध्ये जुनियर महाविद्यालयातील एकूण 3 विद्यार्थी व सीनियर महाविद्यालयातील एकूण 4 विद्यार्थ्यांचा समावेश होता. समाजामधील होतकरू,गरीब व आर्थिकदृष्ट्‌‍या विद्यार्थ्यांना सहाय्य करून त्यांना उच्च शिक्षणामध्ये सहाय्य करावे या दृष्टिकोनातून सुदर्शन केमिकल कंपनी रोहा यांच्यातर्फे दरवर्षी सुधा सितारा या नावाने रायगड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती प्रदान करण्यात येते.

महाविद्यालयातील एकूण 7 विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ हा रोहा येथील डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृह रोहा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र शिष्यवृती विभाग प्रमुख प्राध्यापिका नेहा गावडे व या शिष्यवृत्तीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आंचल दलाल-पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा, वनश्री शेडगे-अध्यक्ष, शिवलिका राजे ग्लोबल प्रमुख आणि उडज सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड हे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

Exit mobile version