विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

| रसायनी | वार्ताहर |

द्वारकाधीश चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून अजित कारखानीस व आसावरी अजित कारखानीस यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथे शिक्षण घेत असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या गरजू शेतकरी तसेच आदिवासी समाज बांधवांच्या 95 शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व इतर शालेय साहित्या सुरक्षित ठेवण्यासाठी दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. यावेळी सरपंच रिया कोंडीलकर, उपसरपंच अनिता अनंता कोंडीलकर, ग्रामस्थ संजय कोंडीलकर, आपटा विभागीय अध्यक्ष कल्पेश कोंडीलकर, शाखाप्रमुख वैभव कोंडीलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित कोंडीलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिल्पा भरत कोंडीलकर, समीर कोंडीलकर महेश टकले, भरत माळी, चंद्रकांत कोंडीलकर, काळुराम माळी, चारुशीला कोंडीलकर, माणिक कोंडीलकर, अनंता कोंडीलकर, धर्मा कोंडीलकर, बाळाराम कोंडीलकर, रघुनाथ म्हात्रे, मीना कोंडीलकर, तृप्ती कोंडीलकर, अनंत कोंडीलकर, नवनाथ कोंडीकलर, प्रकाश झिंगे, मुख्याध्यापक संजय पाटील, शिक्षक निशा कुडावकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे द्वारकाधीश चॅरिटीजकडून दिगंबर गोगटे, संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश कोंडीलकर यांनी केले.

Exit mobile version