| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
‘अंजुमन’ इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा हे महाविद्यालय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून, हीच शिकवण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येते. सामाजिक नाळ जोडण्याचे कार्य या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तेवढ्याच हुरहुरीने करत असतात.
आज दि. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त मुरुड जंजिरा नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 4 येथे माजी विद्यार्थी संघटना यांच्यामार्फत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या शाळेतील काही विद्यार्थी हे आदिवासी वाडी येथून शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांना अभ्यासात मदत व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, शार्पनर इत्यादी साहित्याचा समावेश होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. स्वाती खराडे, प्रा समीक्षा माळी, प्रा. बीस किल्लेदार , प्रा.दानिया भारून, प्रा. नीदा गोरमे व माजी विद्यार्थ्यांमध्ये शमसून्निसा दरज़ी, शिफा दखनी, अनझर उलडे, फातिमा कबले, साक्षी पाडगे, बुशरा उलडे यांनी मेहनत घेतली.