विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

| वेनगाव | वार्ताहर |

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेनगाव मराठी शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी संपूर्ण गावातून सकाळी प्रभातफेरी काढली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सरपंच अभिषेक गायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याठिकाणी सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक हरिश्‍चंद्र जाधव यांनी केले. यावेळी माजी सरपंच भाई गायकर, स्वप्नील पालकर, हरिश्‍चंद्र गायकवाड, उल्हास बोराडे, शरद पालकर, उत्तम जाधव, गोपीनाथ बोराडे, शेलार काका, ग्रामसेवक अरुण करले, संभाजी पालकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सरपंच अभिषेक गायकर, ग्रामसेवक अरुण करले, भाई गायकर, आशा पालकर, स्वनील पालकर, वसंत जाधव, तानाजी सावंत, गोपीनाथ बोराडे, उल्हास बोराडे, बंडू मोरे, छगन गायकवाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक सुषमा रणदिवे, स्वाती मिसाळ, दीपक तुरे, संगीता चित्ते, स्नेहल जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेख पाटकर, रेश्मा वाघमारे, संदीप मुरकुटे, सुषमा वाघमारे उपस्थित होते.

Exit mobile version