विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुडच्या पद्मदुर्ग व्यवसायकरी मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक कामात अग्रेसर आहे. समुद्र किनारी छोटे व्यवसाय करणारे ही मंडळी मुरुडच्या अनेक सामाजिक प्रश्‍नावर मदतीसाठी पुढे येतात. वादळात झालेल्या स्वतःच्या नुकसान सहन करून ज्यांची घर उडून गेली त्यांना आर्थिक मदत केली. आज त्यांच्या मुलाना शालेय साहित्य वाटप करताना पद्मदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर, जानवी सात्वीडकर, उमेश दांडेकर दामोदर खैरगावकर, दीपक इम्तियाज शबाना , जोशी, रुपेश पाटील, उत्तम पाटील, शकील शाबान आदी मान्यवर उपस्थित होते. शाळकरी मुले मायरा पाटील ,किमया सात्विडकर ,देवांग सात्वीडकर, अनुराज खैरगावकर, मानस पाटील, काव्य कांबळे, तन्वी मसाला, अनन्य गायकर, समर्थ अंबुकर, आयुष्य मसाला, स्वरा सात्विडकरत या मुलांना वाटप करण्यात आले.

दोस्ती ग्रुपकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सामाजैक क्षेत्रात कार्य करणार्‍या दोस्ती ग्रुप चे माध्यमातून कोंदिवडे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्राथमिक शाळा कोंदिवडे दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन दोस्ती ग्रुपकडून वाटप करण्यात आल्या. कोंदिवडे ग्रामपंचायतीमधील रहिवासी, ग्रामस्थ आणि दोस्ती ग्रुपचे अमन गायकवाड, रुपेश कदम, समीर कदम, आतिश गायकवाड, यश कदम, ऋषिकेश गायकवाड, भूषण कदम, भावेश कदम, विशाल गायकवाड,अक्षय धनवटे आदी उपस्थित होते.

Exit mobile version