आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरसई तालुका पेण येथे 350 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना ललिता फाऊंडेशन शिहूच्या वतीने शैक्षणिक साहित्य (रायटिंग पॅडचे)वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.व्ही. वणवे हे होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, प्रवचनकार कमलाकर पाटील (मानकुळे), तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.जे. जानकर, अ‍ॅड. हर्षला गदमळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, मंदाकिनी पाटील, यशवंत गदमळे, राजा पाटील, यशवंत म्हात्रे, श्री. खरात, शिक्षिका क्रांती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मंदाकिनी पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शिहू विभागामध्ये ललिता फाऊंडेशनच्या वतीने अनेक लोकोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ललिता फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिल्याने शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने पांडुरंग गदमळे यांचे आभार मानले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन संगीता काळे यांनी केले.

Exit mobile version