| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने कर्जत प्रेस असोसिएशनकडून कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील 100 शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे, तुरीच्या झाडांची रोपे तसेच परसभागेत लावण्यासाठी जंगली झाडांची रोपे आणि गांडूळ खताचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिते ग्रामपंचायत कार्यलयाच्या आवारात 50 झाडांची लागवड देखील करण्यात आली.
कृषिदिनाचे औचित्य साधून कृषी विषयक कार्यक्रमाचे आयोजन जिते ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शशिकांत मोहिते, मारुती गायकवाड, दशरथ जाधव, पांडुरंग म्हसे, संतोष पेरणे, दीपक बोराडे, भूषण प्रधान व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात जमलेल्या जिते कोल्हारे आणि वाकस ग्रामपंचायत मधील 100 हुन अधिक शेतकऱ्यांना दोन तुरीची रोपे, एक जंगली झाड, तसेच एक किलो गांडूळ खत आणि चार प्रकारच्या भाजीपाला बियाणे यांची पाकिटे भेट देण्यात आली. यानंतर ग्रामपंचायत आवारात 50 जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला किशोर गायकवाड, नरेश जाधव, संदेश साळुंखे, रोशन दगडे, सचिन म्हामले, अरुण बैकर, रामदास माळी, सतीश पाटील, कृष्णा सगणे, प्रथमेश कुडेकर, जगदीश दगडे, संकेत घेवारे, अभिजित दरेकर, सतीश भालेराव आदी उपस्थित होते.






