। तळे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा अंतर्गत स्वामी सामाजिक उपक्रम सेवा पनवेल यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिवण क्लासच्या यशस्वी महिलांना स्व. अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी तळा दिपाली शेळके यांच्या हस्ते शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण नुकतेच करण्यात आले.
स्वामी सामाजिक उपक्रम सेवा संस्था पनवेल यांच्या माध्यमांतून स्व. अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे गेले 1 महिना रुबिना परदेशी या शिक्षिकेने तळे तालुक्यातील जवळपास 60 महिलांना शिवणकामाचे ट्रेनिंग दिले. या शिवणकाम ट्रेनिंगमध्ये ब्लाउज, गाऊन, वन पीस ड्रेस अशा विविध प्रकारच्या कपडे शिवण्यासाठी उत्तम प्रकारचे ट्रेनिंग दिले आहे. आपले प्रास्ताविकता रुबीना परदेशी यांनी सांगितले की, आज 60 महिलांना आपण टेलरिंगचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करीत आहोत. या महिला उत्तम शिवणकाम करू शकतात अशी मला खात्री आहे. या सर्व महिलांनी मला नेहमीच सहकार्य केलेले आहे. तसेच महिला बालविकास प्रकल्प अधिकारी तळा दिपाली शेळके यांचे मला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते. स्वामी सामाजिक उपक्रम सेवा पनवेल यांचेही सहकार्य मिळत आहे, असे रुबीना परदेशी यांनी सांगितले.