महिलांना शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

| रसायनी | वार्ताहर |
पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा इंदेमिस्तु ल्युब प्रायव्हेट लिमिटेड व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवणकाम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप सरपंच गौरी गडगे, भूषण दामले इंदेमिस्तू सिनियर मॅनेजर श्रीपाल सप्तसागर प्रकल्पसंचालक येरळा प्रोजेक्ट्स यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भूषण दामले यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज महिला ही प्रत्येक विभागात काम करीत आहेत. महिलांनी आपली प्रगती करावी, याकरिता जीवन कौशल कलेतून महिला सबलीकरण होऊ शकतात आणि आज घरबसल्या उद्योग करू शकतात. श्रीपाल सप्तसागर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तीन महिने आपण हे प्रशिक्षण घेतले आहे, त्याचा उपयोग आपल्या जीवनात करावा व उद्योजक बनावे.

सरपंच गौरी गडगे म्हणाल्या की, वाशिवली येथील महिला सर्व उपक्रमात महिला भाग घेत असतात व तो पूर्ण करतात. या प्रशिक्षणात जी माहिती घेतली त्याची अंमलबजावणी नक्कीच करतील असे म्हणत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक देवदास झेंडे यांनी, तर आभार बाजीराव मेगाने यांनी मानले.

Exit mobile version