। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून महाड शहर व त्याच्या आसपासच्या परिसरातील गावांमधील 600 पूरग्रस्त कुटुंबाना चादरींचे वाटप करण्यात आले.
या महापूरामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. घरांचे नुकसान झाले. लोंकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यामुळे पुरग्रस्तांना मदत करावी, अशी भावना आदर्श पतसंस्थेच्या संचालक मंडळाने व्यक्त केली. त्यानुसार मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 600 कुटुंबाना स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी चादरींचे वाटप करण्यात आले.
आदर्श पतसंस्थेने महाड शहरात तेथील नगरसेवक व मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष कुमार मेहता यांच्या मार्गदर्शना खाली गरजू व ज्यांचे खरोखर नुकसान झाले अशा साधारण 200 कुटुंबांच्या घरोघरी जाऊन चादरींचे वाटप केले. यावेळी आदर्श पतसंस्थेचे चीफ ऑफिसर अजय थळकर, कर्मचारी स्वप्नील वाळंज, प्रसन्न पाटील व सुजित म्हात्रे हे उपस्थित होते.
महाड शहरानजीक असलेले नाते गाव व परिसरातील 400 गरजू व पूरग्रस्तांना चादरींचे वाटप केले. 28 गावांचे नाते, रायगड बौद्ध विकास संस्था, नाते या सभागृहात गरजू पूरग्रस्तांना बोलावून चादर वाटप करण्यात आल्या. यावेळी रायगड बौद्ध विकास संस्था, नाते या संस्थेचे अध्यक्ष अरुण गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश गायकवाड , माजी अध्यक्ष अशोक जाधव , सचिव राजेश साळवे , सल्लागार राजेश सोनावणे हे उपस्थित होते .
आदर्श पतसंस्था नेहमीच समाजिक बांधिलकी समाजातील गरजू लोकाना मदत करते. पुरामुळे महाड तालुक्यात ज्यांचे नुकसान झाले आहे त्याना आम्ही मदत केली. या पुढे देखील सामाजिक काम आम्ही करत राहू.
सुरेश पाटील, अध्यक्ष, आदर्श पतसंस्था