अहिल्या महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम
। खरोशी । वार्ताहर ।
गेली अनेक वर्षे समाजहितासाठी अहोरात्र काम करून जनमानसात जागरुक राहून समाज देवो भव या उक्तीप्रमाणे काम करणार्या अहिल्या महिला मंडळ व संस्थेचे हितचिंतक अजय नाडकर्णी यांच्यातर्फे बेलवडे विभागातील बेदीची वाडी येथील आदिवासी बांधवांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी व येथील जीवनमान उंचावण्यासाठी मंडळाच्या वतीने सोलर लॅम्पचे वाटप करण्यात आल्याने येथील माय भगिनींच्या चेहर्यावर हास्य पाहायला मिळाले.
येथील 37 बांधवांना सोलर दिवे भेट देण्यासाठी संस्थेच्या संस्थापिका वासंती देव, अध्यक्षा अश्विनी गाडगीळ, उज्वला गाडगीळ, संतोष थोरात तसेच अजय नाडकर्णी, सौ.नाडकर्णी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोरोना लसीकरण करण्याबाबत जागृती करण्यात आली. कोरोना काळात घ्याव्या लागणार्या काळजीचेही प्रबोधन करण्यात आले. या सर्व उपक्रमात संतोष थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आश्विन गाडगीळ यांनी सांगितले की, आमच्या मंडळाच्या वतीने 22 वाड्यांवर 600 सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले असून, यापुढे जनसामान्यांसाठी सदैव काम करीत राहणार आहोत.






I like the efforts you have put in this, regards for all the great content.