सुदर्शनकडून शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप

। महाड । प्रतिनिधी ।
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज महाड यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कांबळे/महाड, उर्दू शाळा, शिंदेकोंड व अंगणवाडी येथे शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी काशीद बोलत होते. गटशिक्षणाधिकारी सविता पालकर, सुदर्शन केमिकलच्या उपमहाव्यवस्थापक माधुरी सणस, व्यवस्थापक संदीप काशिद, सरपंच महाडिक, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ व कोरोना योद्धे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुदर्शनकडून सोलर पथदिवे, कचरा व्यवस्थापन, शाळांचे आयएसओ मानांकन असे उपक्रम राबविले जातात. सुदर्शनच्या या मदतीमुळे गावाचा विकास झपाट्याने होत असल्याचे सरपंच महाडिक यांनी सांगितले. पंचायत समितीकडून महाड विभातील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्वरूपात विकसित करण्यात येत आहेत. त्यामध्ये सुदर्शनकडून होणार्‍या प्रयत्नामुळे विशेष सहकार्य होत असून, त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व दुर्बल घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होत आहे, असे पालकर यांनी नमूद केले. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पाडला.

Exit mobile version