| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शासनाने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच एसटी पासचे वाटप करण्याच्या योजना सुरू केली आहे. त्यानुसार नांदगावच्या श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना मुरुड एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन पासचे वाटप केले.
मुरुड आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक गौतम भोसले, वरिष्ठ लिपिक नामदेव डाक, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना खोत, पर्यवेक्षक प्रतिक पेडणेकर, शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील आदींच्या उपस्थितीत पासचे वाटप करण्यात आले.