विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

| चणेरा | प्रतिनिधी |

वरदायिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. पत्रकार जितेंद्र जाधव यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

तळा तालुक्यातील वरदायिनी विद्यालय महागावचे माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी सहयोगी माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला महुरे येथील जयवंत जाधव, पत्रकार राजेंद्र जाधव, रवींद्र कान्हेकर, उध्दव आव्हाड, पोलीस संघटनेचे माजी पदाधिकारी कमलाकर मांगले, मुख्याध्यापक तुकाराम व्यवहारे व शिक्षक उपस्थित होते. ज्या गावात आपले बालपण गेले, ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेला कधीच विसरता कामा नयेत. अधिक दुर्गम भागातील विद्यालये विविध अडचणीत असतात. सामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पाठबळाची गरज असते. ती गरज, सामाजिक बांधिलकी माजी विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे. वरदायिनी विद्यार्थ्यांमध्ये माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी ही जाणीव ठेवत विद्यार्थ्यांना परिपूर्ण शैक्षणिक साहित्य दिले हे कौतुकास्पद आहे. असे सांगत राजेंद्र जाधव यांनी मुलांशी हसत खेळत संवाद साधला. विद्यार्थी, विद्यालयाला सहकार्य करू, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक तुकाराम व्यवहारे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Exit mobile version