विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

| उरण | वार्ताहर |
समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या पांडुरंग चांगू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाणजे उरण येथे मार्च 2022 मध्ये झालेल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले आणि पालक सभाही घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब पाटील होते. प्रमुख अतिथी कामगार नेते व युवा संघटक शेकाप रवि घरत उपस्थित होते. त्यांनी संस्थेला दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली व मार्गदर्शन केले.

यावेळी काकासाहेब पाटील, अ‍ॅड. एम.ए. घरत, प्रमुख वक्ते तु.ह. वाजेकर उच्च माध्य. विद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिनेश सासवडेसर यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शालेय समितीचे चेअरमन सुधाकर म्हात्रे यांनी तीन विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा 5000/- रुपयांपर्यंतचा शालेय खर्च करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव रवींद्र म्हात्रे, सहसचिव अ‍ॅड. प्रदीप पाटील आणि व्हॉईस चेअरमन दि.बा. म्हात्रे, तु.ह. वाजेकर विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख प्रा. कुटेसर, कृष्णा ठाकूर आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक-पालक संघ स्थापन करण्यात आला.

Exit mobile version