कृषी विभागामार्फत भाजीपाला मिनी किटचे वाटप

| उरण | वार्ताहर |

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उरण तालुक्यात प्रकल्प संचालक आत्मा, अलिबाग-रायगड वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग आत्मा अंतर्गत भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात आले. या मिनी कीटमध्ये भेंडी, मिरची, चवळी, काकडी व वांगी इत्यादींचे बियाणे देण्यात आले आहे. सदरील पारसबाग भाजीपाला किटचे वाटप उरण तालुक्यात जवळपास 40 ते 50 गावात वाटप करण्यात आले असून, या किटचा फायदा जवळपास 1500 ते 2000 कुटुंबांना होणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना अर्चना सुळ-नारनवर, तालुका कृषी अधिकारी उरण यांनी उरण तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी गट, आदिवासी बांधव यांनी आपल्या घराच्या शेजारी पारसबागेत लागवड करुन आपल्या आहारात सेंद्रिय व ताज्या भाजीचे प्रमाण वाढावावे यामुळे मुख्यतः आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे तसेच महिलांची आर्थिक बचत होण्यास मदत होईल, असे सांगितले.

या मोहिमेंतर्गत जुई येथे महिला व महिला गटांना पारसबाग किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागातील कर्मचारी विभावरी चव्हाण व नमिता वाकळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version