शेतकर्‍यांना गांडूळ खताचे वाटप

कर्जत प्रेस असोसिएशनचा उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

महाराष्ट्र कृषी दिनाचे निमित्ताने कर्जत प्रेस असोसिएशनकडून तालुक्यातील विविध ठिकाणी कृषीविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यावेळी कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमधील जांभुळवाडी येथील 50 शेतकर्‍यांना भाजीपाला बियाणे, तुरीच्या झाडांची रोपे तसेच परसबागेत लावण्यासाठी जंगली झाडांची रोपे आणि गांडूळ खताचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जांभुळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ आणि तरुणवर्ग सहभागी झाले होते, तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे मुख्य विश्‍वस्त संतोष पेरणे, सामाजिक उपक्रम प्रमुख दीपक बोराडे, संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रधान उपस्थित होते.

दरम्यान, वाडीतील 50 हून अधिक शेतकर्‍यांना दोन तुरीची रोपे, जंगली झाडे, तसेच महिलांना एक किलो गांडूळ खत आणि चार प्रकारच्या भाजीपाला बियाणे यांची पाकिटे भेट देण्यात आली. उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनाही खाऊचे वाटप केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, शिक्षक संजय घरत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पारधी, कर्जत प्रेस असोसिशनचे सल्लागार किशोर गायकवाड, संघटनेचे कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे, उपाध्यक्ष संदेश साळुंखे, खजिनदार रोशन दगडे, कृष्णा सगणे, अरुण बैकर, सतीश पाटील, रामदास माळी, महेश भगत यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version