महिला उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण

| कोर्लई । वार्ताहर ।
भारतीय उद्योजकता विकास संस्था (ई.डी. आय. आय) व टाटा कम्युनिकेशन्स लि. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने बोर्ली येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात दि. 22 जुलै रोजी प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आलेल्या महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एकूण चोविस दिवस चाललेल्या महिला उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बोर्ली-मांडला पंचक्रोशीतील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकीय गुणसंपदा, बँकेच्या योजना इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास प्रकाश सोळंकी,दिपेश जाधव तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय पाटील उपस्थित होते. या वेळी मधुरा पालवणकर, साक्षी गायकवाड़, दिव्या ठाकुर, शितल नागोटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी तरला नागोटकर यांच्या माऊली स्नॅक्स सेंटर या 40 नवीन व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहूण्यांचे हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अलिबागचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले तर समन्वयिका सोनाली जाधव यांनी मानले.

Exit mobile version