| रत्नागिरी | प्रतिनिधी |
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 51व्या कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे दोन्ही खो-खो संघ सहभागी झाले आहेत. त्यात कुमार गटाच्या कर्णधारपदी आशिष बालडे तर मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून दिव्या पालये हिची निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने ओणी हायस्कूल, राजापूर येथे कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांच्या गटात 16 तर मुलींच्या गटात 9 संघ सहभागी झाले होते. खो-खो मार्गदर्शक पांडुरंग पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय नियोजन पद्धतीने पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात ओणी हायस्कूल विरूद्ध ज्युनि. कॉलेज, कसबा, संगमेश्वर हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. सामना अतिरिक्त वेळेत बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद विभागून देण्यात आले. मुलींच्या गटात आर्यन स्पोर्ट्स अ आणि ब संघात अंतिम सामना झाला. आर्यन अ संघाने विजेतेपद पटकावले.
कुमार संघ :
विराज निवते, सार्थक कदम (चिपळूण), आर्यन बालदे, आशिष बालदे, पार्थ बुदर, अथर्व गराटे (संगमेश्वर), शुभम सुवरे, साहिश भलबले, ओमकार बेहरे, मयूर मासये, आराध्य मटकर, अरमान वळंजू, निखिल माळी, राज पळसमकर (राजापूर), विनायक पालये, लांजा. प्रशिक्षक - सिद्धांत कानडे (लांजा), किरण भोसले (राजापूर).
मुली संघ :
दिव्या पालये (कर्णधार), वैष्णवी फुटक, रिद्धी चव्हाण, सान्वी सुर्वे, मृण्मयी नागवेकर, अस्मी कर्लेकर, सायली कर्लेकर, श्रावणी सनगरे, आर्या डोर्लेकर, तन्वी खानविलकर, साक्षी लिंगायत, स्वरांजली कर्लेकर (रत्नागिरी), दिव्या सनगले (संगमेश्वर), दीक्षा मांडवकर (लांजा), दीक्षा गोतावडे (राजापूर). प्रशिक्षक - ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार (रत्नागिरी).
