धर्मादाय रुग्णालयांवर जिल्हा समितीचा नजर

| रायगड । प्रतिनिधी ।

राज्यातील नामांकित धर्मादाय रुग्णालये यापुढे कोणतीही सबब सांगून गरीब रुग्णांना उपचार नाकारू शकणार नाहीत. आता त्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर उच्च अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर उपचार सुनिश्‍चित केले जातील.

राज्यात एकूण 456 धर्मादाय रुग्णालये असून नियमानुसार या रुग्णालयांमध्ये एकूण 12 हजार 212 खाटा गरीब (अल्प उत्पन्न) रुग्णांसाठी राखीव आहेत. या धर्मादाय रुग्णालयांना शासनाकडून अनेक प्रकारच्या सवलती मिळतात. त्या बदल्यात, त्यांना रुग्णालयातील 19 टक्के खाटांवर गरीब रुग्णांना मोफत आणि अनुदानित उपचार देणे आवश्यक आहे. मात्र, ही रुग्णालये खाटा रिकामी नसल्याची सबब सांगून गरीब रुग्णांना दाखल करत नसल्याची तक्रार बहुतांश रुग्णांनी केली आहे. त्यामुळे नुकतीच राज्यस्तरीय हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर या कक्षाच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा दंडाधिकारी-अध्यक्ष जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता दोन वैद्यकीय तज्ज्ञ सहायक धर्मादाय आयुक्त-सदस्य सचिव यांचा समावेश असणार आहे.

Exit mobile version